सिंह प्राण्याचे मनोगत मराठी निबंध | सिंहाचे आत्मकथन निबंध

मी सिंह बोलतोय या सिंहाच्या आत्मकथनामध्ये आपण जंगलाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंहाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला या सिंहाच्या आत्मकथनाच्या माध्यमातून असे जाणवेल जणू सिंह स्वतःच स्वतःविषयी माहिती देत आहे. सिंहाचा रुबाब अधिवास खाद्य अशा एक नी अनेक गोष्टींविषयी माहिती यातून आपल्याला पळून येईल.

सिंह प्राणी

मी सिंह आहे, जंगलचा राजा म्हणून सर्वत्र माझी ख्याती आहे. माझा रुबाब डौलदारपणा सर्वांना भुरळ घालत असतो. खास माझ्या दर्शनासाठी अगदी आफ्रिकेत सुद्धा पर्यटक यायला मागेपुढे बघत नाही. आफ्रिकेमध्ये माझा जन्म झालेला आहे. माझ्या प्रमुख दोन जाती आहेत एक आफ्रिकी सिंह आणि दुसरी आशियाई सिंह. आम्ही सर्व सिंह मांजर कुळातले प्राणी आहोत. आमच्यामध्ये विभिन्नता दिसून येत असली तरी खूप जवळचे भाऊबंद आहोत आम्ही. 

माझ्यामध्ये असलेल्या शक्तीमुळे आणि सौंदर्यामुळे मला जंगलचा राजा म्हणून निवडले गेलेय. जंगलामध्ये सर्व प्राणी मला खूप घाबरतात. जंगलाचा नैसर्गिक अधिवास संतुलित ठेवण्यासाठी आमचा खूप उपयोग होतो. एखाद्या विशिष्ट जंगलामध्ये जिथे आमचा वावर आहे त्या ठिकाणी किती प्राणी असावेत हे आमच्या संख्येवरून ठरत. जंगलाचे देवदूत जरी आम्हाला म्हणल तरी हरकत नाही एवढ मोठ कार्य आमच जंगलासाठी असत.

जंगलामध्ये आमच्या वाढीमुळे आम्ही नैसर्गिकपणे शिकार करणे हद्द ठरवणे असे काम करत असतो. आम्ही ठरवलेल्या हद्दीत कुठलाही इतर आमचा भाऊबंद सिंह येऊ शकत नाही. प्रत्येक सिंहाची एक ठराविक सीमा असते. ठरवण्यात आलेल्या सीमेच्या अंतर्गत जेवढे भक्ष असतील तेवढ्यावर फक्त तिथल्या सिंहाचा अधिकार असेल. समूह करून राहायला एका मर्यादे पलीकडे आम्हाला आवडत नाही. आम्ही परिस्थितीनुसार कधी एकट्याने तर कधी समूहाने शिकार करणे पसंत करतो.  

मी इतर सिंहासोबत जसा जसा मोठा होत गेलो तसा मला माझ्या क्षमतेवर विश्वास निर्माण झाला. सुरुवातीला शिकार करणे हे माझ्यासाठी एवढे सोपे नव्हते मात्र रोजचा शिकारीचा सराव माझी क्षमता वाढवण्यास मदत करतो. दहा वेळा प्रयत्न केले तेव्हा कुठे एक शिकार मला मिळते. कधी कधी शिकारीसाठी खूप मैलांचा प्रवास मला करावा लागतो. जंगलचा राजा असल्यामुळे सर्व प्राणी माझ्यापासून अंतर ठेवून असतात. 

माझी गर्जना सिंहगर्जना म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा मी सिंहगर्जना देतो तेव्हा तब्बल 5 किलोमीटर पर्यंत माझ्या गर्जनेचा आवाज घुमतो. मी नेहमी गर्जना देत नाही, निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार माझी गर्जना आपसूकच माझ्या दाढेतून बाहेर येते. माझी गर्जना इतर प्राण्यांसाठी एक ताकीद असते. माझी गर्जना ऐकल्यानंतर सर्व प्राणी सुसाट पळायला लागतात. जंगलचा राजा असल्यामुळे नेहमी मला मानसन्मान मिळेल असे नाही माझ्या आयुष्यात खूप मोठा वेळ हा संघर्ष करण्यामध्ये जातो. 

जंगलामध्ये माझी कोणीही शिकार करत नाही तरीही कपटी आणि धूर्त काही मानवी शिकारी माझी तस्करी करण्यात पटाईत आहे. माझ्या चमड्या पासून मासा पर्यंत अंधश्रद्धेचा विळखा बसलेला आहे. पूर्वी माझी संख्या मोठ्या प्रमाणात होती, मात्र माझी वाढती शिकार तस्करी यामुळे अगदी नामशेष होण्याच्या पायरी पर्यंत मजल गेलेली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार बदलणे हे मला जमायला हवे तरच चांगला तग मी जंगलामध्ये धरू शकतो. 

मी काही अचानक शिकारी प्राणी बनलेलो नाही, मुळात निसर्गतच माझी रचना जंगलाचे संतुलन ठेवण्यासाठी झालेली आहे. ज्या जंगलामध्ये माझे अस्तित्व असते त्या जंगलाला इतर जंगलांच्या तुलनेत जास्त महत्त्व प्राप्त होते. जंगलामध्ये माझा अधिवास असणे म्हणजे तिथला निसर्ग सुजलाम सुफलाम आहे असे पर्यावरण तज्ञांकडून समजले जाते. माझा घटता अधिवास पर्यावरणाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ करू शकतो, यामुळे आमच्या हालचालींवर मुख्य ठिकाणची सरकार लक्ष ठेवून आहेत. 

जंगलामधील माझ आयुष्य आव्हानांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक मिनिटाला माझ्यासमोर आव्हान असते, आव्हानाला तोंड दिल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. माझ्या चालण्याला सुद्धा साहित्यामध्ये विशेष नाव दिले आहे, सिंहावलोकन. मी खूप सावध राहणार प्राणी आहे. माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवर माझ बारीक ध्यान असत. चोहीकडे प्रमाणात लक्ष असल्यामुळेच मला माझा अधिवास टिकवणे शक्य होते. 

आफ्रिका खंडातील सव्हाणा गवताळ प्रदेशात माझी संख्या इतर जंगलांच्या तुलनेत जास्त आहे. गवताळ प्रदेशातील पूरक वातावरण व भक्षांची मोठी संख्या यामुळे तिथे माझा प्रजनन दर सुद्धा जास्त आहे. आफ्रिकेच्या जंगलातील वातावरण मला खास मानवते.आफ्रिकेत माझं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक नॅशनल पार्कला भेट देतात. मी प्रत्यक्षात दिसण पर्यटकांसाठी खूप मोठी पर्वणी असते. पर्यटक मला बघून धन्य होऊन जातात यात शंका नाही. 

मी एक प्रेरणादायी प्राणी आहे कारण एकदा भक्षाच्या पाठीमागे पडल्यास भक्षाला पकडल्याशिवाय मी थांबत नाही. माझ्या ध्येयामुळे आणि कठीण परिश्रमामुळेच मी जंगलाचा राजा म्हणून प्रसिद्ध झालो आहे. मला जेवढी प्रसिद्धी मिळाली ती फक्त याच जोरावर. माझे दिसणे रुबाब शिकार करण्याची पद्धत हे सर्वच वेगळ आहे. मला गर्व आहे माझ्या ताकदीचा व मी जंगलचा राजा आहे याचा. जंगलामध्ये सर्व प्राणी मला दबकून राहण्यातच सुख समजतात. 

कदाचित मला यामुळेही राजा म्हणून निवडले गेले असावे कारण मी नेहमी सुखवस्तू म्हणून राहत नाही  तर सातत्याने शिकारीसाठी प्रयत्न करत असतो. माझ्या प्रयत्नांचे फळ म्हणूनच मला शिकार मिळत असते. काही वेळा असही घडत जेव्हा मला शिकार मिळणे कठीण होत अशावेळी धैर्य राखणे मी गरजेच समजतो. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत लढत राहणे ही माझी खरी ओळख आहे.  

बाहेरून माझं आयुष्य जरी सुंदर दिसत असल, तरी प्रत्यक्षात बराच काळ मला खूप वेदनांमध्ये जगाव लागत. वाढती जंगलतोड बदलता निसर्ग या चक्रांना पार करणे प्रसंगी माझ्यासाठी मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे सुद्धा असते. मी जेवढी मेहनत करतो तेवढा माझा जिवंत राहण्याचा टक्का वाढतो हे नक्की. मी राजा असल्यामुळे कुणाचीही सहानुभूती मला मिळणे कठीण असते. आयुष्यात पुढे जाण्यावर मी जास्त भर देतो. शिकार नाही मिळाली तर दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात करतो. 

मी सिंह असल्यामुळे पूर्ण आयुष्य हे आव्हानांना स्वीकारण्यातच जात. माझा जन्मच आव्हान पेलण्यासाठी झाला आहे अस मला वाटत. निसर्गाच आव्हान थोड म्हणून की काय मानवी आव्हान सुद्धा माझ्यासमोर उभी ठाकलेली आहेत. नैसर्गिक आव्हानांना सामोरे जाण्याची माझी बरीच कुवत आहे मात्र मानवी आव्हान मला जबर त्रासदायक ठरत असतात. दिवसेंदिवस माझा आव्हानांमध्ये कमी होण्याऐवजी वाढ होत आहे. मी संपुष्टात आल्यास इतर पर्यावरणीय साखळी सुद्धा संपुष्टात येण्याचा धोका नाकारता येत नाही. 

माझ्या मानवाला असलेल्या नैसर्गिक फायद्यांविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या नैसर्गिक संख्येमध्ये संतुलन टिकवून ठेवायचे असेल तर प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे आहे. जे व्यक्ती आमच्या अधिवासापासून अनभिज्ञ आहेत त्यांना माझ्या विषयी माहिती देणे महत्त्वाची ठरते. जेवढ्या जास्त प्रमाणात मला जवळून ओळख मिळेल तेवढी माझ्या संतुलनाची शाश्वती वाढीस लागू शकते. निसर्ग आणि मानव यांच्यातीलच मी सुद्धा एक दुवा आहे हे विसरून चालणार नाही.

Leave a Comment